Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लष्कर पोलिस स्टेशन – पुण्यातील निलंबीत पोलिस कर्मचार्‍याची शेजार्‍यास मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील निलंबीत पोलिस कर्मचार्‍याने शेजारी राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना कॅम्प परिसरातील एम.जी. रोडवर (MG Road, Camp Pune) घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस स्टेशनमध्ये (Lashkar Police Station) संबंधित निलंबीत पोलिसासह एका महिलेविरूध्द गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अरफाज आरिफ शेख Arfaz Arif Shaikh (27) याच्यासह एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरफाज आरफि शेख याला पोलिस दलातून निलंबीत करण्यात आले आहे. याप्रकरणी अमीर हनिफ पटेल (65) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 17 मे 2023 रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पटेल हे त्यांच्या घरासमोरील अंगणात बसले होते. (Pune Crime News)

त्यावेळी फिर्यादी पटेल यांच्या घरामागे राहणार्‍याने महिलेने त्यांना माझे फोटो का काढले, तुम्हाला माझे फोटो काढण्याचा अधिकार कोणी दिला असे सुनावले. दरम्यान, निलंबीत पोलिस कर्मचारी अरफाज आरिफ शेखने मी पोलिस आहे, मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत लाकडी बाबुंने फिर्यादी आणि फिर्यादीच्या मुलाला डोक्यात मारहाण केली. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बनसुडे करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Lashkar Police Station – Pune’s suspended policeman assaulted his neighbor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

Solapur Crime News | सीआयडीचे पथक अटकेसाठी आल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr. PI), सहाय्यक निरीक्षकासह 7 पोलिस ‘फरार’

Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारेंचे काहीच चुकले नाही, पण बीडच्या जिल्हाध्यक्षांचे आरोप महत्त्वाचे’, भाजप आमदाराचे ठाकरेंवर गंभीर आरोप (व्हिडिओ)