Pune Crime News | बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला 17 लाखांना लुबाडणार्‍या वकिलाला अटक; हनी ट्रॅप करणार्‍या तरुणीवर FIR

पुणे : Pune Crime News | बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे सांगून फ्लॅटवर नेऊन एका तरुणीने त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यानंतर त्या व्यावसायिकाला बलात्काराची केस (Rape Case In Pune) करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १७ लाख ५० हजार रुपये लुबाडणार्‍या वकिलाला हडपसर पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

विक्रम भाटे Adv Vikram Bhate (वय ३५, रा. हडपसर – Hadapsar News) अशी अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. निधी दीक्षित Nidhi Dixit (वय २५, रा. वाघोली – Wagholi News) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मगरपट्टा सिटी (Magarpatta City News) येथील एका ४२ वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९३/२३) दिली आहे. हा प्रकार सिजन मॉल, निधी दीक्षित हिच्या घरी आणि विक्रम भाटी याच्या कार्यालयात ३ ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. ते ३ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा मित्र व त्याची मैत्रिण यांच्याबरोबर सिजन मॉल येथील प्लॉयहाय रेस्टारंटमध्ये (Ployhigh Restaurant, Season Mall) गेले होते. त्यांच्या टेबलवर एक मुलगी आली. तिने लायटर मागण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी ओळख करुन घेतली. आपले नाव निधी दीक्षित असून मुंबईहून पुण्यात आले असून बिझनेस करण्यासाठी तुमची मदत लागेल, असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला.

त्यानंतर तिने व्हॉटसअ‍ॅप कॉलवर फिर्यादी यांच्याशी बोलणे सुरु केले. ७ नोव्हेबर रोजी तिने बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्या वाघोलीतील फ्लॅटवर नेले. तेथे ती बेडरुममध्ये गेली व पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. फिर्यादी यांच्या शेजारी बसून तिने ४-५ क्लोज सेल्फी काढले. त्यानंतर ती परत बेडरुममध्ये गेली. ड्रेस बदलून बाहेर आली व फिर्यादी यांना तू येथे कशाला आलास, येथे काय काम आहे तुझे, येथून चालता हो, असे बोलली. तिच्या स्वभावात अचानक झालेला बदल पाहून फिर्यादी घाबरुन तेथून निघून आले व त्यांनी तिचा मोबाईल ब्लॉक केला. (Pune Crime News)

त्यानंतर १५ नोव्हेबर रोजी निशा गुप्ता (Nisha Gupta) हिच्या फोनवरुन तिचा वकील विक्रम भाटे याने फोन केला.
निधी दीक्षित यांनी तुमच्यावर अशी तक्रार केली आहे की त्यामध्ये तुम्हाला बेल मिळणार नाही.
हे प्रकरण मिटवायचे असेल तर मला सांगा मी तुम्हाला मदत करतो. तुमची केस मिटवून टाकतो.
फिर्यादी यांनी घाबरुन मदत करा, असे सांगितले. तेव्हा विक्रम याने ८ लाख रुपयांची मागणी केली.
तेव्हा त्यांनी इतके पैसे आता नाहीत, असे सांगून गळ्यातील सोन्याची चैन, लॉकेट असे ६ तोळ्याचे सोने
निशा गुप्ता हिच्याकडे देऊन मुथूट फायनान्समध्ये (Muthoot Finance) तारण ठेवून विक्रम भाटे याला पैसे दे
असे सांगितले. त्यानंतर १६ नोव्हेबरला निशा गुप्ता हिने १ लाख ६० हजार रुपये विक्रम भाटे याला दिले.
त्यानंतर विक्रम भाटे याने वेळोवेळी त्यांना धमकावून अगदी सर्वाच्च न्यायालयातही जामीन मिळणार नाही
असे सांगून त्यांना लुबाडत राहिला. त्यानंतर निशा हिने फिर्यादी यांना सांगितले की, विक्रम भाटे, निधी दीक्षित,
वैभव शिंदे (Vaibhav Shinde) हे लोकांना जाळ्यात फसवून त्यांच्याकडून पैसे काढतात.
तुलाही फसवून पैसे काढण्याकरीता सांगितले होते. परंतु फिर्यादी हा माझा चांगला मित्र आहे मी तसे काही करणार नाही, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

पोलिसांनी विक्रम भाटे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के
(Sub-Inspector of Police Sontakke) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Lawyer arrested for extorting 17 lakhs from businessman by threatening to file rape case; FIR on honey trap girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी