Pune Crime News | सिंहगड कॅम्पसमध्ये कोयत्याने दहशत माजवणार्‍या म्होरक्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सिंहगड कॅम्पसमध्ये (Sinhgad Campus) कोयत्याने दहशत माजवणार्‍या म्होरक्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) बीडमधून (Beed) अटक केली आहे. करण अर्जुन दळवी Karan Arjun Davli (21, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)

दि. 28 डिसेंबर 2022 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड कॅम्पसमध्ये अथर्व सुनिल लाडके (20, रा. सिंहगड व्हॅली, आंबेगाव बु., पुणे) हे मित्रांसोबत गप्पा मारत होते होते. त्यावेळी आरोपी करण अर्जुन दळवी आणि त्याचा साथीदार सुजित गायकवाड यांनी दहशत पसरविण्याच्या हेतूने हातात लोखंडी कोयता घेवुन, कोयता हवेत फिरवुन येणार्‍या-जाणार्‍या लोकांना धाक दाखवुन दुकानांचे शटरवर वार करून तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडयांवर कोयता मारून दहशत निर्माण करत होते. त्यावेळी परिसरात नागरिक सैरावैर होवून पळून गेली. आरोपींनी फिर्यादी अर्थवचा मित्र तन्मय ठोंबरे याच्या पाठीवर स्टुल फेकुन मारला. अर्थवच्या मानेवर कोयत्याने वार केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

गुन्हा दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार दळवीचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार हर्षल शिंदे (Harshal Shinde) आणि धनाजी धोत्रे (Dhanaji Dhotre) यांना दळवी हा बीडमध्ये लपुन बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकातील उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), अंमलदार शिंदे, धोत्रे आणि सचिन गाडे हे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. त्यांनी दळवीला बीड येथून ताब्यात घेवुन अटक केली आहे.

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण
(ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट (Sr. PI Shrihari Bahirat),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ
(API Amol Rasal), उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, शैलेश साठे,
सचिन सरपाले, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे,
आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, आणि राहुल तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :-  Pune Crime News | Leader who terrorized Sinhagad campus with coyote arrested by bharti vidyapeeth police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma Andhare | बंगल्यांच्या चौकशीबाबत बोलायचं असेल तर किरीटभाऊंनी आधी मुख्यमंत्र्यांकडे पहावं – सुषमा अंधारे

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे हाजिर हो!, ‘या’ तारखेला राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार, काय आहे प्रकरण?