पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रेयसीसोबत फिरत असल्याने मित्राचा गळा चिरुन खून करुन त्याचे शीर धडावेगळे करणाऱ्या एकाला सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Pune Crime News)
निजाम आसगर हाश्मी (वय-19 रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. उमेश भीमराव इंगळे असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक बसवराज उजने यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa) फिर्याद दिली होती.19 जून 2018 रोजी धड नसलेला मृतदेह अर्धनग्न अवस्थेत मिळून आला होता. पोलिसांना संशय आल्याने निजाम हाश्मी याला अटक केली होती. (Pune Crime News)
आरोपी हाश्मी याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. उमेश हा नेहमी तिच्यासोबत फिरतो. तिच्याशी लगट करतो म्हणून हश्मी आणि इंगळे यांच्या वाद झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने आरोपीने उमेशला बोलावून घेतले. त्याच्यावर सत्तुरने वार केले. उमेशचे शीर धडावेगळे करुन मृतदेह कोंढवा भागात टाकला होता. तर शीर स्वारगेट येथील कालव्यात टाकले होते. (Pune Crime News)
या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी 24 साक्षीदार तपासले. यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला.
कोंढवा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास केला.
पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले,
न्यायालयीन अंमलदार म्हणून सहायक पोलीस फौजदार महेश जगताप यांनी काम पाहिले.
त्यांना पोलीस शिपाई अंकुश केंगले यांनी मदत केली.
गुप्तांग कापून कॅनॉलमध्ये टाकले
घटनेच्या दिवशी आरोपी हाश्मी याने उमेश याला शिरखुर्मा पिण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेला.
त्यानंतर त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने गुप्तांग कापून पिशवीत टाकले.
ती पिशवी स्वारगेट येथील कॅनॉलमध्ये फेकून दिली. या पिशवीत सत्तूर आणि इंगळेचा मोबाईल, आधार व पॅन कार्ड होते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bail In MCOCA-Pune Crime | पुणे : मोक्का गुन्ह्यातील आरोपीला स्पेशल मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर