Pune Crime News | गौतमी पाटील प्रमाणे व्हिडिओ व्हायरल करण्याची महिलेला दिली धमकी; इंस्टाग्राम अकाऊंटहोल्डरवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) हिचे कपडे बदलत असल्याचा व्हिडिओ पाठवून तसेच तुमचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी एका महिलेला देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी लोहगावमधील एका २६ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात
(Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०६/२३) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटहोल्डरवर (Instagram Account) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑफिशीयल गौतमी व गौतमी एफसी व राहुल अशा
इन्स्टा ग्रामवरुन फिर्यादी यांना गौतमी पाटील ही कलाकार कपडे बदलतानाचा व्हिडिओ चित्रित करुन तो
व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व व्हॉटसअॅपवर प्रसारीत केला. फिर्यादी व त्यांचे सहकार्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची
धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Like Gautami Patil, the woman was threatened to make the video viral; A case has been filed against the Instagram account holder
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Satara Crime News | दहावीच्या निरोप समारंभाला जाताना दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू तर दोघेजण जखमी
Pune Crime News | तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांनी महिला पोलीस उपनिरीक्षकाला केली धक्काबुक्की