Pune Crime News | लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | क्लासला जात असताना रस्त्यात अडवून तो रोड रोमिओ (Road Romeo) त्रास देत होता. बुधवारी सायंकाळी तर तो चक्क घरात शिरला. तिचा विनयभंग (Molestation Case) करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तिच्या आईला समजल्यावर ती त्या मुलाला पकडण्यासाठी गेली. तोपर्यंत १५ वर्षाच्या मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केली. (Pune Crime News)

त्रिशला बंडु कवडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत तिची आई आशा कवडे (रा. मोझे आळी, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७८/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोमनाथ ऊर्फ कोल्ह्या संजय राखपसरे Somnath alias Kolhya Sanjay Rakhapsare (वय २२, रा. मोझे आळी, लोहगाव) याला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच गल्लीत राहतात. फिर्यादीची मुलगी त्रिशला ही आठ दिवसांपूर्वी क्लासला जात असताना सोमनाथ राखपसरे याने रिक्षा तिच्याजवळ थांबवून बस अ‍ॅटोत, मी सोडवतो, असे म्हणून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सोमनाथ त्यांच्या घरात शिरला. फिर्यादी यांची मुलगी हॉलमधील सोफ्यावर बसली होती. सोमनाथ तिच्या शेजारी बसून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करत असताना मुलगी पलीकडे सरकली. त्याचवेळी फिर्यादी घरात आल्या. त्यांना पाहून सोमनाथ फिर्यादी यांना धक्का देऊन पळून गेला. फिर्यादी या त्याला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावत गेल्या. इकडे मुलीने दरवाजा बंद करुन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Pune Suicide News) केली. पोलिसांनी विनयभंग, पोक्सो व आत्महत्येस जबाबदार धरुन सोमनाथवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने (API Lahane) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | ठेकेदाराकडून लाच घेताना राजगुरु नगरपरिषदेतील मुख्याधिकारी, महिला अभियंता, लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Elections | 48 मुस्लिम नेते सांभाळणार लोकसभा प्रचाराची जबाबदारी; चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Pune News | आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

Modi Govt On Ujjwala Yojana | एलपीजी गॅस संदर्भात खुशखबर! केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतून 75 लाख मोफत गॅस कनेक्शन