Pune Crime News | लोणीकाळभोर पोलिसांनी विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगाराला पकडलं, गावठी पिस्तुलासह काडतुस जप्त

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणी काळभोर पोलिसांनी (loni kalbhor police) विशेष मोहिमेत एका सराईत गुन्हेगाराला पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व काडतुस जप्त केले आहे. गणेश बाळासाहेब बधे (वय 20, रा. उरुळी देवाची) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (loni kalbhor police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या आदेशानुसार पुणे शहर पोलीस दलाने गुरुवारी मध्यरात्री एकत्रित अचानक विशेष मोहीम (कोंबिंग ऑपरेशन) राबवत गुन्हेगाराची चेकिंग आणि धरपकड केली आहे. लोणी काळभोर पोलिस (loni kalbhor police) हद्दीत गस्त घालत चेकिंग करत असताना त्यांना गणेश बधे यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पण, पोलीस दिसताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (deputy commissioner of police
namrata patil), सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते (assistant commissioner of
police kalyanrao vidhate) यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी
(senior police inspector rajendra mokashi), पोलीस निरीक्षक सुभाष काळे (Police
Subhas Kale), सहाय्यक निरीक्षक राजू महानोर, नितीन गायकवाड, अमित साळुंखे, श्रीनाथ
जाधव, सुनील नागलोत, राजेश दराडे, डिंगबर साळुंखे, बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे
यांच्या पथकाने केली आहे.

हे देखील वाचा

MP Sanjay Raut । पिंपरी-चिंचवड महापालिकेत सेनेचाच महापौर होणार; संजय राऊत म्हणाले…

PUWJ Pune | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे मंगेश कोळपकर, सरचिटणीसपदी ‘मटा’चे सुजित तांबडे तर खजिनदारपदी ‘लोकमत’चे निलेश राऊत बिनविरोध

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | loni kalbhor police arrest one criminal, recover pistol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update