Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन : माजी सरपंचाविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी लावण्याबाबत अर्ज केल्यानंतर चौकशी सुरू झाल्याचा राग मनात धरून महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी माजी सरपंचाविरूध्द (Former Sarpanch) लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये (Loni Kalbhor Police Station) विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा (Atrocity Act)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

विठ्ठल राजाराम शितोळे Vitthal Rajaram Shitole (रा. कोरेगाव मुळ, पुणे – Koregaon Mul Pune) असे
गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक महिती अशी की,
फिर्यादी यांनी माजी सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्याविरूध्द घराच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर वारस लावल्याबद्दल चौकशी लावण्याबाबत अर्ज केला होता. सदरील अर्जाची चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचा राग मनात ठेवुन शितोळेने दि. 5 मे 2023 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी या पायी जात असताना त्यांना ओढुन माझ्या गाडीत बस व कपडे काढ असे बोलुन विनयभंग केला. फिर्यादी या अनुसूचीत जातीच्या आहेत हे माहित असताना देखील त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. (Pune Crime News)

घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीचे वडिल शितोळे याच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना देखील
दमदाटी केली. त्यामुळे विठ्ठल शितोळे याच्याविरूध्द विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई (ACB Bajrang Desai) करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Loni Kalbhor Police Station: A case of molestation, atrocity filed against former sarpanch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘राष्ट्रवादीचे आमदार भाजपात येण्यास तयार, पण…’, भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Crime News | विश्रामबाग पोलिस स्टेशन : पतीनेच सासू आणि त्यांच्या मित्राचे फोटो मार्फ करुन बनवले नग्न फोटो, नातेवाईकांना पाठवून केला विनयभंग

Pune LokSabha Bypoll Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक ‘या’ तारखेच्या आत होणे अपेक्षित, जाणून घ्या सविस्तर