Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – हप्ते थकल्याने भररस्त्यात गाडी चोरुन नेण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गाडीचे हप्ते थकल्याचे सांगून सोलापूर -पुणे महामार्गावर (Pune-Solapur Highway) भर रस्त्यात गाडी थांबवून ती जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रयत्न तिघांनी केला. तरुणाने केलेला प्रतिकार आणि लोक जमल्याने तिघे पळून गेले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत कृष्णा हरीदास कदम (वय २८, रा. हनुमानवाडी, केळगाव) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ३१७/२३) दिली आहे. ही घटना सोलापूर पुणे महामार्गावरील उरुळी कांचन (Uruli Kanchan) ते सोरतापवाडी (Sortapwadi) दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे दोन मित्र कारमधून जात होते. यावेळी पांढर्‍या रंगाच्या ब्रेझा कारने त्यांना ओव्हर टेक करुन थांबण्याचा इशारा केला. फिर्यादी यांनी गाडी थांबविल्यावर त्या कारमधून तिघे उतरले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन आमच्या गाडीला कट मारुन आला काय असे बोलून फिर्यादीच्या कानशिलात मारली. फिर्यादीचा मित्र सचिन नावडकर यांच्या कानातील सोन्याची बाळी हिसकावू लागला. तेव्हा मित्राने त्यास ढकलून बाजूला केले.

त्यावर दुसरा पुढे येऊन फिर्यादीला म्हणाला, तुमच्या गाडीचे किती हप्ते थकले आहेत माहित आहे का.
लय मस्ती आल्यासारखे वागू नका. आता तुमची गाडीच जमा करतो,
असे बोलून जबरदस्तीने गाडीचे ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
तेवढ्यात फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी प्रतिकार करुन आरडाओरडा केल्याने तसेच इतर येणारी जाणारी वाहने थांबल्याने ते तिघे पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – Attempted to steal a car due to unpaid installments

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांना तेव्हापासूनच भाजपमध्ये जायचं होतं’, शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट

MP Supriya Sule | मोफत तिकिटासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी ! अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत
सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या – ‘खासदारांना अशी वागणूक तर…’

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात
साजरी करणार; किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Maharashtra Politics News | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘पहाटेचा शपथविधी…’