Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर ! महिलकडे केली शरीर सुखाची मागणी

पुणे : Pune Crime News | महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी (Physical Relation) करुन तिचा हात पकडून विनयभंग (Molestation Case) केला. त्यानंतर हे प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देणार्‍या ग्रामपंचायत सदस्यावर (Grampanchayat Member) लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

सचिन गुलाब निकाळजे Sachin Gulab Nikalje (रा. कोरेगाव मुळ – Koregaon Mul) असे त्याचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३२८/२३) दिली आहे. हा प्रकार १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व १७ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काम करुन घरी जात असताना सचिन निकाळजे याने
चारचाकी गाडीतून पाठलाग करुन त्यांना थांबविले. त्यांचा हात पकडून तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस,
असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली.
फिर्यादी यांनी धक्का दिला असताना त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन गेल्या होत्या. हा प्रकार त्यांनी पतीला सांगितला.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक धायगुडे (Sub-Inspector of Police Dhaygude) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – Gram Panchayat Member’s Dirty Picture ! He asked the woman for body pleasure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाहीत, मनसे प्रमुख राज ठाकरेंचे परखड मत

Pune Crime News | पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर (Retired ACP) विनयभंगाचा गुन्हा दाखल

Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांचं निधन, निवृत्तीनंतर स्थापन केला होता स्वतःचा राजकीय पक्ष