Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

पुणे : Pune Crime News | शहरामध्ये पानटपरी, हातगाडी लावण्यासाठी तेथील गुंडाची अगोदर परवानगी घ्यावी लागते, त्यांना हप्ता द्यावा लागतो तर ग्रामीण भागात कोणतेही काम करायचे असेल तर तेथील गुंडांनाही हप्ता द्यावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांच्या खंडणीची (Extortion Case) मागणी गुंडांच्या टोळक्याने केली. पैसे दिले नाही तर तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार उरळी देवाची येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अमोल रत्नाकर वाजे (वय ४०, रा. फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी (Pune Police) सनी मोहन शेवाळे Sunny Mohan Shewale (वय २५, रा. उरळी देवाची, हवेली) या गुंडाला अटक केली आहे. त्याचे साथीदार प्रसाद भाडळे व आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उरळी देवाची गावाचे स्मशानभूमीजवळील ओढ्याजवळ शनिवारी दुपारी १ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी शेवाळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड (Criminals On Pune Police Records) आहे. फिर्यादी हे खासगी पाईपलाईन दुरुस्तीचे काम करत होते. सनी शेवाळे हा त्यांच्याकडे आला. तलवारीचा धाक दाखवून फिर्यादी यांना उभा चिरण्याची धमकी दिली. फिर्यादीस पाईपलाईनचे काम चालू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी (Ransom Case) केली.
प्रसाद भाडळे व त्याच्या साथीदाराने लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केली.
तेथे लोक जमले. सनी शेवाळे याने हातातील तलवार व दांडके हवेल फिरवत
“आम्ही इथले भाई असून कोणी मध्ये आले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही,
असे बोलून दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक खैरनार (API Khairnar) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vegetarian Protein Food | प्रोटीनसाठी नॉन व्हेज पदार्थांचीच गरज नाही, ‘हे’ व्हेज फूड सुद्धा करतील मदत