Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे समलैंगिक संबंधातून बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या 21 वर्षीय तरूणाचा खून

Murder In Pune Wagholi

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत एकाचा समलैंगिक संबंधातून (Homosexual Relationship) खून (Murder In Pune) करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.28) सायंकाळी वाघोली येथील बकोरी रोड (Bakori Road Wagholi) येथे घडली आहे. आरोपीने 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून केला. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

लोणीकंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी बकोरी रोड वाघोली येथे एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. यात गंभीर जखमी झाल्याने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीत तरुणाचा मृत्यू झाला. (Pune Crime News)

मयत तरुण हा वाघोली येथील बीजीएस कॉलेज मध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाढीबोलाई येथे एका हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याने रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यास, ज्याने त्याला मारले त्या आरोपीचे नाव सांगितले आहे. तसेच हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाल्याचे सांगितले. यानंतर तरुण बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

लोणीकंद पोलिसांनी तपासात समोर आलेल्या बाबीनुसार हा खून समलैंगिक संबंधातून
झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे तरुणाचा खून झाला आहे
याचा तपास पोलीस करीत आहेत.
जखमी झालेल्या तरुणाने त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला दिलेल्या तोकड्या वर्णनावरुन आरोपी निष्पन्न झाला असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”

Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

Pune Pimpri Crime News | हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना