Pune Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminal) लोणीकंद पोलीस ठाण्यातील तपास पथकाने अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल (Pistol) आणि दोन जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. ही कारवाई (Pune Crime News) मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) बकोरी रोडवरील लेबर कॅम्पसमोर केली.

विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी (वय-21 रा. माऊली पार्क, बकोरी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Lonikand Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव (Swapnil Jadhav) यांना माहिती मिळाली की, बकोरी रोडवरील लेबर कॅम्प समोर एक व्यक्ती थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 काडतुसे आढळून आले. पोलिसांनी (Pune Police) 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar),
पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (Police Inspector Maruti Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव (Gajanan Jadhav), पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे,
स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, अजित फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार,
मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Lonikand Police arrests a pistol-carrying inn criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole | ‘विधीमंडळाचाच नाही तर जनतेचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही’ – नाना पटोले

Pune Kasba Peth Bypoll Election Results | कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

MP Sanjay Raut | संजय राऊत हक्कभंग प्रकरणी दोन दिवसांत चौकशी, 8 मार्चला निर्णय; राहुल नार्वेकरांची माहिती