Pune Crime News | हरवलेले 21 मोबाईल लोणीकंद पोलिसांनी मुळ मालकांना केले परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणीकंद परिसरातून गहाळ (Missing), हरवलेले 21 मोबाईल (Lost Mobile) शोधण्यात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी (Pune Police) मोबाईल मालकांचा शोध घेऊन त्यांना परत केले आहेत.

मोबाईल गहाळ, हरवले याबाबत अनेकांनी लोणीकंद पोलिसांकडे तक्रारी (Pune Crime News) केल्या होत्या. हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) यांनी लोणीकंद सायबर तपास पथकाला (Cyber Investigation Team) दिले होते.

सायबर तपास पथकाने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेल्या मोबाईलची माहिती मिळवून, तसेच तांत्रिक विश्लेषण करुन विविध भागातून 21 मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अॅपल (Apple), सॅमसंग (Samsung), वन प्लस (Oneplus), वीवो (Vivo), ओप्पो (Oppo), रियल मी (Realme), एम आय अशा कंपन्यांचे मोबाईल होते. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या हस्ते हे मोबाईल मुळ मालकांना परत देण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma) सध्या अतिरिक्त पदभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार
(Senior Police Inspector Gajanan Pawar), पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील
(Police Inspector Maruti Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे
(PSI Suraj Gore), पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे,
कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Lonikand police returned 21 lost mobiles to their original owners

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे