Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन – माझे वाटोळे करते काय म्हणत पोटात लाथ मारुन विवाहितेचा केला गर्भपात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आई समवेत जाणार्‍या विवाहितेला माझे वाटोळे करुन तुझी पोरगी कशी सुखी संसार करते बघुन घेतो, अशी धमकी देऊन विवाहितेच्या पोटात लाथ मारुन तिचा गर्भपात (Abortion) केल्याचा धक्कादायक प्रकार वाघोलीमध्ये घडला. (Pune Crime News)

 

याबाबत एका २२ वर्षाच्या विवाहितेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (ग़ु. रजि. नं. ४३१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल मुकेश पवार Rahul Mukesh Pawar (वय २१), करण मुकेश पवार Karan Mukesh Pawar (वय २५, दोघे रा. विटळकर चाळ, वाघोली) यांच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. फिर्यादी या २६ मे रोजी रात्री ९ वाजता सार्वजनिक शौचालयातून घरी जात होत्या. त्यावेळी राहुल पवार हा तेथे आला. त्याने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करुन फिर्यादीच्या पोटात लाथ मारली. माझे वाटोळे करुन तुझी पोरगी कशी सुखी संसार करते बघून घेतो, अशी धमकी दिली. दोघांनी फिर्यादी यांना दगड फेकून मारले. फिर्यादी यांच्या पोटात दगड लागल्याने त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा त्यांना तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा गर्भपात झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार (API Pawar) तपास करीत आहेत.

 

Advt.

Web Title :  Pune Crime News | Lonikand Police Station Abortion Karan Mukesh Pawar Rahul Mukesh Pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा