Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – 3 हजार रूपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून करणार्‍या कॅब चालकाला अटक; जाणून घ्या मर्डरची स्टोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | 3 हजार रूपयांसाठी संगणक अभियंताचा खून (Murder Of Computer Engineer In Pune) करणार्‍या कॅब चालकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. पुणे-नगर रस्त्यावरील (Pune Nagar Road) वाघोलीत (Wagholi) मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी संगणक अभियंत्याचा मृतदेह आढळला (Dead Body Found In Lonikand Area) होता. त्याचा गळा चिरून खून (Murder In Pune) झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी खून करणार्‍या कॅब चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, त्याचा एक साथीदार पसार झाला आहे. (Pune Crime News)

भगवान सदाशिव केंद्रे Bhagwan Sadashiv Kendre (22, रा. परतापूर, ता. कळंब, जि. धाराशिव – Kalamb Dharashiv) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने गौरव सुरेश उरावी Gaurav Suresh Uravi (35, रा. खराडी, मुळ रा. शिवाजीनगर, अमरावती – Shivaji Nagar Amravati) याचा खून केला होता. भगवान केंद्रेचा साथीदार फरार असून दोघांविरूध्द लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये (Lonikand Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव उरावी हा खराडी येथील आयटी कंपनीत नोकरीस होता. खराडी परिसरातच तो मित्रांबरोबर एका सोसायटीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गौरव जेवण्यासाठी जातो असे मित्रांना सांगुन बाहेर पडला. मात्र, घरी परतला नाही. भगवान केंद्रे हा पुण्यात अ‍ॅप आधारित कॅब चालवत होता. गौरवने अ‍ॅपवरून कॅबची दोन वेळा नोंदणी केली होती. गौरव आणि भगवान केंद्रे यांची ओळख होती. गौरवने कॅब चालक भगवान केंद्रेचा मोबाईल नंबर घेतलेला होता. गौरव भगवानला 3 हजार रूपये देणे लागत होता. त्याने वेळेवर पैसे दिले नाहीत म्हणुन भगवानचा त्याचावर राग होता.

 

शुक्रवारी रात्री भगवानने गौरवला बोलावून घेतले.
भगवान आणि त्याच्या साथीदाराने कॅबमधून गौरवला वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी नेले.
त्यांच्यात वादीवाद झाला. त्यानंतर भगवानने त्याचा खून केला अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार (Gajanan Pawar),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील (PI Maruti Patil) आणि इतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Lonikand Police Station – Cab driver arrested for murdering
computer engineer for 3 thousand rupees; Know the story of the murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ईडीची नोटीस राष्ट्रवादीच्या नेत्याला, जुंपली ठाकरे गट अन् शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये; 5
लाखांच्या बक्षिसाला 10 लाखांचे प्रत्युत्तर

Jayant Patil | ‘कायदा व सुव्यवस्था राखणं पोलीस दलाचं काम पण…’; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ आरोपांवरुन जयंत पाटलांचा
गृहमंत्र्यावर निशाणा

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा;
लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन संघांचा दुहेरी विजय; लिंक्स् इलेव्हन संघाने गुणांचे खाते उघडले

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कर्नाटकात पराभूत होण्याचं कारण, म्हणाले – ‘
कधी कधी स्थानिक ठिकाणी…’ (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार! ‘त्या’ आवाहनावरुन नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल

IPS Praveen Sood Appointed As CBI Director | वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या
संचालकपदी नियुक्ती; जाणून घ्या प्रवीण सूद यांच्याबद्दल थोडक्यात