Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : टेम्पोचालकावर कोयत्याने वार करुन लुटले; बाजारात जात असताना वाटेत साडेपाच लाख रुपये लुबाडले

पुणे : Pune Crime News | दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्याने टेम्पोला थांबायला भाग पाडून टेम्पोचालकावर कोयत्याने वार (Koyta) करुन त्याला लुटण्यात (Pune Robbery) आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत रियाज चांदभाई मुलाणी (वय ४१, रा. वाडेबोल्हाई, वाडेगाव) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४०/२३) दिली आहे. हा प्रकार तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ (Indrayani River Bridge Tulapur) शनिवारी सकाळी सव्वा सहा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे दर शनिवारी आठवडे बाजार असतो. या बाजारासाठी फिर्यादी व त्यांचा साथीदार राजेंद्र जाधव हे टेम्पोमधून जात होते. इंद्रायणी पुलाजवळ दुचाकीवरुन आलेल्या तिघांना टेम्पोला दुचाकी आडवी लावून थांबायला भाग पाडले. फिर्यादी यांना हाताने मारहाण (Beating) करुन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या खिशातील ५ लाख ५० हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पळून गेले. (Pune Crime News)

Advt.

हल्लेखोरांना फिर्यादी यांच्याकडे इतके पैसे आहेत, याची माहिती असावी. त्यातूनच पाठलाग करुन त्यांना
लुटल्याचा पोलिसांचा संशय आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Lonikand Police Station: Tempo driver attacked and robbed;
While going to the market, five and a half lakh rupees were looted on the way

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा