Pune Crime News | बंडगार्डन, वानवडी आणि कोंढव्यात पादचार्‍यांना लुटलं

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या अन लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांनी हैदोस घातला असून, विविध भागात तीन ठिकाणी पादचाऱ्यांना अडवून लुटण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. बंडगार्डन, वानवडी व कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक भीतिच्या छायेखाली वावरत आहेत.

Pune Crime News | Looted pedestrians in Bundgarden, Wanwadi and Kondhwa area

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सोमनाथ कुलकर्णी (वय 19) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रोहित विजय शिंदे (वय 21) याला अटक करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पंधरा दिवसांपूर्वी ससून हॉस्पिटल समोरील रस्त्यावरून रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पायी चालत घरी जात होते. त्यादरम्यान एकजण दुचाकीवर पाठीमागून आला.

Devendra Fadnavis । ‘ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, निवडणुका रद्द केल्या नाहीत तर… – फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

त्याने फिर्यादी यांना धक्का दिला व त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. फिर्यादी तरुण मात्र गाबी गेला होता. त्यामुळे त्याने लागलीच तक्रार दिली नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Pune Crime News | पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीमधून लाखाचा गांजा जप्त

तसेच दुसरा प्रकार हा वानवडीत घडला असून, याबाबत नितीन कांतीलाल मोहिते (वय 35) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शादाब युसुफ अन्सारी (वय 19) फौय्याज शिराउद्दीन अंसारी (वय 21) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Lonavala Police | पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटक निघाले लोणावळयाला, 3 हजार पर्यटकांना लावला 22 लाखापेक्षा जास्त दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सय्यदनगर येथील रेल्वे गेट जवळून जात होते. यावेळी
दोघांनी त्याचे जवळचा 10 हजार रुपयांचा मोबाईल हिसकामारत चोरून नेला. तर एकाने त्यांच्या
दिशेने दगडफेक करत त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. हा प्रकार घेताच त्यांनी वानवडी
पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Udayanraje Bhosale । गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत

हा प्रकार चार दिवसांपूर्वी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. तसेच कोंढव्यातील
गोकुळनगर येथे तरुणीचा मकबाईल हिसकवला आहे. याबाबत साक्षी विकास लाड (वय 25) यांनी
तक्रार दिली आहे. आरोपी हे ऑफिस सुटल्यानंतर मित्राची वाट पाहत थांबल्या होत्या. यादरम्यान
दुचाकूवर अज्ञात चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ येऊन त्यांच्या हातातील दहा हजार रुपये
किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेऊन गेला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | Looted pedestrians in Bundgarden, Wanwadi and Kondhwa area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update