Pune Crime News | मेव्हण्याने बँक कर्ज न फेडल्याने घर जप्तीची नोटीस आल्याने एकाने केली आत्महत्या; खिशातील चिठ्ठीने उघड झाला प्रकार

पुणे : Pune Crime News | बहिणीच्या पतीला मदत करण्यासाठी त्यांनी स्वत:चे घर गहाण ठेवून कर्ज (Loan) काढून दिले. त्याशिवाय पतसंस्थेतील कर्जाला जामीनदार राहिले. पण मेव्हण्याने कर्जफेड न केल्याने बँकेने घरजप्तीची नोटीस पाठविली. त्या तणावातून एकाने गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. खिशातील चिठ्ठीवरुन हा प्रकार उघड झाला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी हिना विजय हेरकळ (वय ४५, रा. अलोकनगरी सोसायटी, कसबा पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संदीप ऊर्फ नितीन मधुकर मोरे आणि दिपा मोरे (रा. जोशी आळी, शिवाजीनगर गावठाण) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर येथील साज चेंबर्स येथे १७ एप्रिल २०२१ रोजी पहाटे घडला होता. विजय कृष्णराव हेरकळ असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती विजय हेरकळ यांची बहिण दिपा मोरे हिने तिचे पती संदीप मोरे यांना पैशाची गरज असल्याचे सांगितले.
तेव्हा त्यांनी आपले राहते घर गहाण ठेवून साऊथ इंडियन बँकेतून १० लाख रुपयांचे कर्ज काढले.
त्याचे हप्ते संदीप मोरे भरतील, या अटीवर त्यांनी ५ मार्च २०१९ रोजी त्यांना साडेआठ लाख रुपये दिले.
परंतु, मोरे याने हप्ते भरले नाहीत. जानेवारी २०२० मध्ये त्यावरुन त्यांच्या नातेवाईकांमध्ये बैठक झाली.
संदीप मोरे याने ज्ञानदीप को ऑप सोसायटी पतसंस्था येथून कर्ज काढले होते.
त्याला विजय हेरकळ जामीनदार राहिले होते. त्याचेही हप्ते न भरल्याने पतसंस्थेना त्यांना नोटीस पाठविली होती. त्याबाबत हेरकळ यांनी वारंवार आपली बहिण व तिच्या पतीला कर्जाचे हप्ते भरण्यास सांगितले होते. परंतु, त्यांनी हप्ते भरले नाहीत. त्यामुळे एप्रिल २०२१ मध्ये बँकेने गहाण ठेवलेले घर जप्त करण्याची नोटीस पाठविली. त्यामुळे ते सतत तणावात होते. त्यातूनच १७ एप्रिल २०२१ रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे विधी केल्यानंतर घरातील कपडे आवरत असताना त्यांच्या पँटच्या
खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यात दिपा मोरे व संदिप मोरे यांना माझ्या मृत्युस जबाबदार धरणे मी जेवढी
कर्ज काढली आहे. ती सगळी या दोघांसाठी वापरली आहेत. त्यामुळे इतर कोणासही जबाबदार धरु नये,
असे लिहिलेले व त्यासाठी स्वाक्षरी केलेले आढळून आले. तसेच इंग्रजीमध्येही चिठ्ठी लिहून ठेवली होती.
त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते. ही चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे तपासणीसाठी पाठविले होते.
त्याचा अहवाल तब्बल २ वर्षांनी आता आला. ते हस्ताक्षर विजय हेरकळ यांचेच असल्याने आता पोलिसांनी
गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Man commits suicide after receiving foreclosure notice from brother-in-law for non-payment of bank loan; The type revealed by the note in the pocket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल