Pune Crime News | गैरव्यवहार प्रकरणात कारागृहात असणारे मंगलदास बांदल 21 महिन्यानंतर बाहेर येणार, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

0
497
Pune Crime News | mangaldas bandal gets bail after 21 months by high court pune
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात (Shivajirao Bhosale Cooperative Bank Embezzlement Case) मागील 21 महिन्यांपासून कारागृहात असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर (Pune Crime News) केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील अटक असलेल्या सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर (Bail Granted) झाला आहे.

याबाबत शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे (Dattatray Mandre) यांनी 21 एप्रिली 2021 रोजी तक्रार दिली होती. मांढरे यांच्या तक्रारीवरुन मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या तक्रारीवरुन बांदलांसह त्यांच्या जवळचे मित्र व काही बँक अधिकाऱ्यांना अटक (Arrest) झाली होती. त्यानंतर अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. बांदल यांच्यावर एकूण पाच गुन्हे (FIR) दाखल झाले होते.(Pune Crime News)

याप्रकरणी बुधवारी (दि.18) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी झाली. यात बांदल यांच्यासह त्यांच्यासोबत अटकेत असणाऱ्या सर्वांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला, अशी माहिती अ‍ॅड. आदित्य सासवडे (Adv. Aditya Saswade) यांनी दिली. बांदल यांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी (Senior Advocate Ashok Mundargi), अ‍ॅड. आबाद पोंडा (Adv. Abad Ponda), अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम (Adv. Aniket Ujjwal Nikam), अ‍ॅड. तपन थत्ते (Adv. Tapan Thatte) व अ‍ॅड. आदित्य सासवडे यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान, न्यायालयाच्या वेबसाईटवर न्यायालयीन आदेश अपलोड झाला नाही.
त्यामुळे आदेश अपलोड झाल्यानंतर सर्वांची नावे जाहीर होतील.
जामीन प्रक्रियेला आणखी चार ते पाच दिवस लागतील.
यानंतरच बांदल आणि इतर बाहेर येतील अशी माहिती अ‍ॅड. अदित्य सासवडे यांनी दिली.

Web Title :- Pune Crime News | mangaldas bandal gets bail after 21 months by high court pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘प्रत्येक महिन्याला 5 हजार दिले नाहीतर…’, पान टपरी चालकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला; म्हणाल्या – ‘विरोधातील दिवस देखील…’