Pune Crime News | ‘मंगेश कदम याचा नंबरकारी आहे, तुमची चांगली जिरवतो’; पोलिसांना मारहाण करीत मोटारसायकल पेटवून देण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | स्वत:ची मोटारसायकल पाडून ती पेटवून देण्यास विरोध केल्याने पोलिसांना पाईपाने मारहाण (Beating) केली. मी मंगेश कदम याचा नंबरकारी आहे, तुमची चांगली जिरवतो, मी तुम्हा पोलिसांना सोडत नसतो, तुमचा खून करुन टाकतो, अशी धमकी देणार्या पंटरला हवेली पोलिसांनी अटक केली. (Pune Crime News)
वैभव बाळासाहेब इक्कर (वय २२, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) असे अटक (Arrest) केलेल्या गुंडाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार विलास प्रधान (वय ३९, रा. कोल्हेवाडी) यांनी हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९/२३) दिली आहे. ही घटना अखिल कोल्हेवाडी शिवजयंती उत्सव मंडळाजवळ १९ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वा आठ वाजता घडली. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रधान व पोलीस नाईक मुंढे हे शिवजयंतीनिमित्त कोल्हेवाडी येथे बंदोबस्त करीत होते. कोल्हेवाडी शिवजयंती उत्सव मंडळाचा कार्यक्रम सुरु असताना वैभव हा मोटारसायकलवरुन तेथे आला. मोठमोठ्याने त्याने मोटारसायकल रेस केली. त्यामुळे कार्यक्रमाला जमलेले लोक इकडे तिकडे झाले. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मोठमोठ्याने आरडा ओरडा करत “मी कोण आहे तुम्ही ओळखत नाही का” असे म्हणून स्वत:ची मोटारसायकल खाली पाडली.
“आता ही तुमच्यासमोर गाडी जाळून टाकतो,” असे म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यक्रमातील लोकांना धोका होऊ नये, म्हणून त्याला पोलीस ताब्यात घेत असताना त्याची आई आली व तिने “वैभ्या पोलिसांना सोडू नको मार यांना” असे म्हणत पोलिसांचे जर्किंन पकडत पोलिसांना धक्काबुक्की केली. वैभव याने तेथील पाईप उचलून पोलिसांना मारहाण केली. तरी पोलीस नाईक मुंढे यांनी त्याला पकडून ठेवले. तेव्हा त्याने शिवीगाळ करीत “मी तुम्हा पोलिसांना सोडत नसतो. तुमचा खून करुन टाकतो. मी मंगेश कदम याचा नंबरकारी आहे. तुमची चांगली जिरवतो, असे म्हणून पोलिसांना धमकी दिली. यामध्ये दोन्ही पोलीस कर्मचारी यांना दुखापत झाली. पोलिसांनी वैभव इक्कर याला अटक केली आहे.
Web Title :- Pune Crime News | ‘Mangesh Kadam is the number one of this, you will
be well taken care of’; Attempted to set the motorcycle on fire by beating the police
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपकडून दहशतीचे वातावरण, नाना पटोले यांचा गंभीर
आरोप; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना निवेदन - Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- Solapur Crime News | धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा धारदार हत्याराने वार करुन खून