Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – रात्री क्रिकेट खेळणार्‍या मुलांना टोळक्याने केली मारहाण; मोटारसायकल, कारची केली तोडफोड

पुणे : Pune Crime News | बिबवेवाडीत (Bibvewadi) रात्री क्रिकेट खेळणार्‍या मुलांना टोळक्याने शिवीगाळ करीत धमकावून बेदम मारहाण (Beating) केली. तसेच त्यांच्या पार्क केल्याचा ५ मोटारसायकल व कारवर दगड, कोयता, कुंडीने मारुन तोडफोड केली. (Pune Crime News)

याबाबत अंकीत भैरुप्रसाद सैन (वय २४, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळु बाबु पवार Balu Babu Pawar (वय १९, रा. बिबवेवाडी) व त्याच्या ५ साथीदारांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बिबवेवाडीतील संत निरंकारी सतसंग भवनच्या समोर बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इतर मुलांबरोबर क्रिकेट (Cricket) खेळत होते.
यावेळी बाळु पवार व त्याचे साथीदार तेथे आले.
त्यांनी फिर्यादी व त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार्‍या मुलांना क्रिकेट बंद करा, असे धमकावून शिवीगाळ केली.
मैदानामध्ये दगड फेकले.
त्यामुळे मुले भितीने पळून जात असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन हाताने तसेच बॅटने मारहाण करुन दुखापत केली.
बाळु पवार याने त्याच्या हातातील कोयता फिर्यादीवर उगारुन या ठिकाणी खेळायला आले तर तंगडे तोडीन, अशी धमकी दिली.
तसेच खेळायला आलेल्या मुलांनी पार्क केलेल्या पाच मोटारसायकलीवर दगड, कोयता व कुंडीने मारुन त्यांची तोडफोड केली.
मैदानाचे समोर पार्क केलेली स्कोडा गाडीने बाळु पवार याने हातातील कोयता मारुन तिच्या काचा फोडून नुकसान केले.
सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (API Kamble) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Market Yard Police Station – NIGHT Boys playing cricket beaten up by gang; Motorcycles, cars vandalized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News |  ‘एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस…’, सापनाथ-नागनाथ टीकेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

ACB Demand Case | देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता? पोलिसावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

New Education Policy | पुढील वर्षी दहावी- बारावी बोर्डाची परीक्षा होणार का नाही?, याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्षांचे स्पष्टीकरण