Pune Crime News | मार्केटयार्ड: चेस्टामस्करीचा राग आल्याने मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | गप्पा मारत असताना सुरु असलेल्या चेस्टा मस्करीचा राग आल्याने तिघांनी आपल्याच मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तसेच बांबुने मारहाण (Beating) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

याबाबत हनुमंत सोमनाथ शिंदे (वय २५, रा. भिमाले कॉम्प्लेक्स, संदेशनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश वाघमारे (वय १८), योगिराज वाघमारे (वय ४०), धनराज वाघमारे (वय ५०, सर्व रा. भिमाले कॉम्पलेक्स, मार्केटयार्ड) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भिमाले कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी गणेश वाघमारे हे मित्र असून सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांच्यामध्ये मस्करी चालू होती.
त्याचा गणेश याला राग आला. त्याने इतरांना बोलावुन घेतले.
फिर्यादी यांना शिवीगाळ करुन इतरांनी आणलेल्या हत्याराने व बांबुने फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले.
योगीराज वाघमारे याने बांबुने तर धनराज वाघमारे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी हनुमंत शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा
गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (API Kamble) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

06 September Rashifal : मिथुन, कन्या आणि तुळसह २ राशीच्या जातकांना मिळू शकते शुभवार्ता, वाचा दैनिक भविष्य

Pune Crime News | बिबवेवाडी: पार्सल घेताना धक्का लागल्यानंतर अल्पवयीन युवकांकडून तरूणावर खुनी हल्ला

Side Effects Of Turmeric Milk | या ५ लोकाना त्रासदायक ठरते Curcumin, चुकूनही पिऊ नका हळदीचे दूध