Pune Crime News | क्रिकेट खेळण्याच्या वादातून मावस भावाने केला 3 लहान बहिणींवर हल्ला; 3 अल्पवयीन मुली गंभीर जखमी, वारजेमधील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | क्रिकेट खेळण्यावरुन मावस भांवडांमध्ये झालेल्या वादातून दोघा मावस भांवडांनी ३ अल्पवयीन बहिणींवर लोखंडी रॉडने हल्ला करुन मारहाण (Beating) केली. या घटनेत या तीनही मुली जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे़ ही घटना वारजेतील दांगट वस्ती येथे शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी कृष्णा सहानी (Krishna Sahani) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली असून पोलिसांनी रामनाथ सहानी (Ram Nath Sahani) व राम सहानी (Ram Sahani) आणि इतर 1 जणांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजेतील दांगट पाटील वस्तीमध्ये मावस भावंडांमध्ये क्रिकेट खेळावरुन काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन कृष्णा सहानी याने दुसर्‍या मुलांना मारहाण केली होती. हे समजल्यावर रामनाथ सहानी व राम सहानी हे इतर दोघांना घेऊन त्यांच्या घरी जाऊ लागले. हे समजल्यावर कृष्णा याने आपल्या घरी फोन करुन हे मारायला येत आहेत. दरवाजा उघडू नको, असे सांगितले. रामनाथ सहानी व इतरांना दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांना कृष्णा दिसला नाही. त्यांनी त्याची आई व तीन बहिणींना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. घरातील सामानाची तोडफोड करुन निघून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या चौघांना नागरिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यातील दोघींची प्रकृती गंभीर आहे. (Pune Crime News)

वारजे पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Maternal brother attacked 3 younger sisters over dispute over playing cricket; 3 minor girls seriously injured, shocking incident in Warje

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश