Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आमदाराच्या चुलत भावासह दोघांना पुण्याच्या लाचुलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे (Pune ACB Trap). थेट पोलिस निरीक्षकासाठी एवढ्या मोठ्या लाचेची मागणी (Bribe For Police Inspector) झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे (Pune Bribe Case). दरम्यान, अटक करण्यात आलेल्यापैकी एकजण आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

खाजगी इसम अक्षय सुभाष मारणे (Akshay Subhash Marne), आणि गणेश बबनराव जगताप Ganesh Babanrao Jagtap (रा .सासवड – Saswad, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन (Saswad Police Station) येथे तक्रारी अर्ज केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक घोलप (Police Inspector Gholap) यांचेकरीता अक्षय मारणे याने 3,00,000 (तीन लाख रूपये ) लाचेची मागणी केली त्या लाचमागणीस गणेश जगताप (रा.सासवड) याने सहाय्य केले. म्हणुन लाचमागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune ACB Trap)

दरम्यान, अटक करण्यात आलेल्यापैकी एकजण आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असल्याची
माहिती समोर आली आहे. गणेश बबनराव जगताप हा आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap)
यांचा चुलत भाऊ असल्याचं सांगितलं जातंय. तसेच तो युवक काँग्रेसचा (Youth Congress Maharashtra)
प्रदेश महासचिव देखील आहे असं बोललं जातंय. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने गणेश जगताप याच्यासह मारणेला अटक केल्यानं राजकीय वर्तुळात देखील प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार (DySP Kranti Pawar),
पो नि संदीप वऱ्हाडे, सहा पो उप नि – मुकुंद आयाचीत ,पो काॅ तावरे,चालक पो कॉ पांडुंरग माळी यांनी केली आहे.

Web Title :- Pune ACB Trap | MLA’s cousin who demanded a bribe of Rs 3 lakh for police inspector, youth congress state general secretary caught in anti-corruption ‘net’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | पराभवामुळे त्यांचे डोळे उघडले, 40 टक्के सवलतीच्या निर्णयावरुन रवींद्र धंगेकरांचा सरकारला टोला (व्हिडिओ)

Jayant Patil | ‘…तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व उरणार नाही’, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन जयंत पाटीलांचा शिंदे गटाला धोक्याचा इशारा