Pune Crime News | ताडीवाला रोड पसिरात दहशत पसरविणार्‍या गुन्हेगारी टोळीवर ‘मोक्का’

0
1224
Pune Crime News | MCOCA 'Mokka' Acction on the criminal gang spreading terror along Tadiwala Road
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ताडीवाला रोड आणि परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्काअंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आत्तापर्यंत 17 टोळयांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime News)

सागर उर्फ सॅगी किशोर गायकवाड (21, रा. चमन बेकरी समोर, ताडीवाला रोड), प्रतिक सुनिल काकडे (22), रोहन उर्फ पांडया सुनिल काकडे (24), रामनाथ उर्फ पापा मेनीनाथ सोनवणे (21) आणि शुभम जीवन वानखेडे (21, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रत्नाचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी स्वतःची संघटीत टोळी तयार करून गुन्हे केलेले आहेत. त्यांनी अवैध मार्गाने फायदा मिळविण्याच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी आणि वारंवार शस्त्रांचा वापर करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वेळावेळी केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी गुन्हे केले आहेत. (Pune Crime News)

आरोपींविरूध्द मोक्का कारवाई करण्यासाठी बंडगार्डन पोलिस ठाण्याचे (Bundgarden Police Station)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील (Sr PI Santosh Patil) यांनी उपायुक्त स्मार्तना पाटील
(DCP Smartana Patil) यांच्या मार्फतीने अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदरील प्रकरणाची छाननी करून आरोपींविरूध्द मोक्का कायद्यान्वये
कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक
(Jt CP Sandeep Karnik), अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहाय्यक आयुक्त आर.एन. राजे (ACP N. R. Raje) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते (Ashwini Satpute) , तपास पथकाचे उपनिरीक्षक रविंद्र गावडे
(PSI Rajendra Gavde)आणि निगराणी पथकाच्या पोलिस अंमलदारांनी ही कामगिरी केली आहे.

Web Title :- Pune Crime News | MCOCA ‘Mokka’ Acction on the criminal gang spreading terror along Tadiwala Road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | पराभवामुळे त्यांचे डोळे उघडले, 40 टक्के सवलतीच्या निर्णयावरुन रवींद्र धंगेकरांचा सरकारला टोला (व्हिडिओ)

Jayant Patil | ‘…तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व उरणार नाही’, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन जयंत पाटीलांचा शिंदे गटाला धोक्याचा इशारा