Pune Crime News | पुण्यातील इराणी टोळीतील 21 जणांवर मोक्का कारवाई ! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 25 गँगवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी खडकी परिसरातील (Khadki Police Station) कासीम उर्फ चित्ता बाबरबुरूज इराणी Kasim Irani Gang (टोळीचा म्होरक्या) आणि त्याच्या इतर 21 साथीदारांविरूध्द मोक्का कायद्यान्वये MCOCA (Mokka Action) कारवाई केली आहे. आयुक्तांनी पदभार स्विकारल्यापासून आतापर्यंत तब्बल 25 संघटीत गुन्हेगाीर करणार्‍या टोळींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime News)

 

महम्मद हुसेन इराणी (23), गुलाबनबी हुसेन इराणी (30), सकिना फिरोज इराणी (50), सनोबर हुसेन इराणी (55), कुल्सुम मोहम्मद शेख (28), राणी हुसेन इराणी (25), आमना उर्फ हमना याकुब इराणी (27), सैय्यदनुर जनशा इराणी आणि स्क्साना सय्यदनुर इराणी (सर्व रा. महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांना खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांच्या इतर फरार साथीदारांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

टोळीचा म्होरक्या कासीम उर्फ चित्ता बाबरबुरूज इराणी आणि त्याच्या इतर साथीदारांनी दि. 21 एप्रिल 2023 रोजी रात्री साडेदहा वाजता महमंद शौकत शेख याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. भांडणे साडेविण्यासाठी महमंद शेख यांची बहिण गेली होती तर आरोपींनी त्यांना खाली पाडून त्यांना विनयभंग देखील केला होता. आरोपी महिला सकिना फिरोज इराणी हिने महमंद शेख यांच्या तोंडत्तवर काटा चमच्याने मारहाण करून जखमी केले होते. कासीम उर्फ चित्ता इराणी हा त्याच्या इतर साथीदारांना सोबत घेवुन संघटित गुन्हेगारी करीत होता. त्यांच्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.

आरोपींविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणून खडकी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane) यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) करीत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यापासुन आतापर्यंत 25 गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील (Police Inspector Mansing Patil),
पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magadum) आणि पोलिस पथकाने मोक्काचा प्रस्ताव सादर केला होता.

 

 

Web Title :  Pune Crime News | MCOCA (Mokka) action against 21 people from the Irani gang in Pune!
MCOCA on 25 gangs by Police Commissioner Ritesh Kumar so far

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा