Pune Crime News | बिअर शॉपीच्या मालकास खंडणीची मागणी करणार्या वारजे माळवाडीतील भैया शेंडगे टोळीविरूध्द मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वारजे परिसरातील करण प्लाझा येथील रोझरी शाळेजवळील (Rosary School Warje) बिअर शॉपीच्या मालकाकडे हप्त्याची मागणी करणार्या तसेच खंडणी उकळणार्या भैय्या शेंडगे टोळीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी मोक्का MCOCA (Mokka Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Crime News)
लक्ष्मण उर्फ भैय्या येडबा शेंडगे (23), स्वामी उर्फ काळु ज्ञानेश्वर खवळे (22), आदित्य गणेश मंडलीक (20) आणि अनिल बापु बनसोडे (30, सर्व रा. म्हाडा वसाहत, वारजे माळवाडी) यांच्याविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी भैय्या शेंडगे हा टोळीप्रमुख असून त्याने काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन संघटीत टोळी तयार केली. त्यांच्या टोळीने खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत करणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. आरोपींनी संघटित दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गुन्हे केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना समज दिल्यानंतर देखील त्यांच्या सुधारणा झाली नाही. (Pune Crime News)
वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे (Warje Malwadi Police Station) वरिष्ठ निरीक्षक डी.एस. हाके
(Sr PI D.S. Hake), पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे (PI Dattaram Bagwe) यांनी
सहाय्यक आयुक्त रूक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) आणि पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा
(IPS Suhail Sharma) यांच्या मार्फतीने अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale)
यांच्याकडे आरोपींविरूध्द मोक्का कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
Web Title :- Pune Crime News | MCOCA Mokka against Bhaiya Shendge gang in Warje Malwadi demanding extortion from beer shop owner
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update