Pune Crime News | फिनिक्स मॉलमध्ये माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या रविंद्र ससाणे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विमाननगर येथील फिनिक्स मॉल (Phoenix Mall) मधील एका कंपनीच्या शोरूम चालकाला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन खंडणी (Extortion उकळणाऱ्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) आयपीसी 386, 387, 341, 34 नुसार गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला होता.

रविंद्र जयप्रकाश ससाणे (वय-49 रा. चंदनननगर, पुणे), मंगल रमेश सातपुते (वय अंदाजे 40 रा. धानोरी, विश्रांतवाडी), दिपक संपत गायकवाड (वय-40 रा. खडकी) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी रविंद्र ससाणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

रविंद्र ससाणे याने गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत ठेवण्यासाठी धमकी, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ले करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा केले आहेत.

फिनिक्स मॉल येथील एका कंपनीच्या शोरुमचे इंटर रिनोव्हेशनचे काम सुरु होते. या कामसाठी लागणारे प्लायवुडचा ट्रक फिनिक्स मॉल येथे आला आसता आरोपींनी ट्रकमधील प्लायवुड फियादी यांच्या कामगारांना खाली करुन न देता आडवणूक केली. तसेच आम्ही येथील स्थानिक असल्याचे सांगून फिर्य़ादी यांच्याकडे खंडणी मागणी केली. तसेच फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव विमानतळ
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Senior Police Inspector Vilas Sonde यांनी
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग
रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करुन आरोपींवर मोक्का कारवाईचे आदेश दिले.

Advt.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate) सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप
(Police Inspector Mangesh Jagtap), पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कोळ्ळुरे (PSI S.S. Kollure)
पोलीस अंमलदार उमेश धेंडे, सचिन जाधव, तोडकर, वाघुले, भोर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | MCOCA – ‘Mokka’ on Ravindra Sasane and his gang who extorted money under the name of Mathadi in Phoenix Mall

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना