Pune Crime News | पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील हळंदे टोळीवर मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  बिबवेवाडी भागातील गुन्हेगार दर्शन हळंदे टोळीवर (halande gang) पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाई केली आहे.
त्यात दोघांना अटक केली आहे.
तर इतरांचा शोध घेतला जात आहे. आयुक्तांचा हा 32 वा मोक्का आहे.

दर्शन युवराज हळंदे (वय 21) व रोहन उर्फ मोन्या बाळू सातपुते (वय 18, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

दर्शन हळंदे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार  आहे.
त्याने हम रस्त्यावर 5 साथीदारसोबत घेऊन संघटित गुन्हेगारी हळंदे टोळी (halande gang) तयार केली.
तर येथे एका तरुणावर कोयत्याने वारकरत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.
या गुन्ह्यात या दोघांना अटक केली आहे.
त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करताना दर्शन याने टोळी तयार करून या भागात गंभीर गुन्हे करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली असल्याचे समोर आले.
त्यानुसार त्याच्यावर मोक्का कारवाई करावी असा प्रस्ताव बिबवेवाडी पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठवला होता.
या प्रस्तावाची छाननी करण्यात आली.
त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
यानुसार आयुक्तांची हि 32 वि मोक्का कारवाई आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी

संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले – ‘भाजपानं ते पत्र आणि शिवसेनेनं फसवलं यामधून बाहेर पडावं’

Web Title : Pune Crime News mcoca mokka on the halande gang in Bibwewadi area of Pune