Pune Crime News | कोरेगाव पार्क येथे गोळीबार करुन दहशत माजवणाऱ्या अजय साळुंके याच्यासह 5 जणांवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथे हवेत गोळीबार (Firing) करुन दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या याच्यासह 5 जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी (Pune Crime News) कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) 6 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 5 जणांना अटक केली आहे. अजय काळुराम साळुंके आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख अजय काळुराम साळुंके उर्फ धार अज्या (वय-23), नितीन उर्फ नट्टा मोहन म्हस्के (वय-32), संतोष सिद्धार्थ चव्हाण (वय-27), अजय उर्फ सोन्या गिरीप्पा दोडमणी (वय-26), नटी उर्फ रोहन उर्फ ऋषीकेश मोहन निगडे (वय-28 सर्व रा. ताडीवाला रोड, पुणे) यांच्यासह फरार असलेल्या आरोपीवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात 307,324,143,144,147,148,149,506(2), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) अन्वये गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

आरोपींनी पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केला. तसेच हवेत गोळीबार करुन दहशत माजवली. हा प्रकार 24 नोव्हेंबर 2022 रोजी गेरा लिजंट सोसायटीच्या पार्कींग मध्ये व योगी पार्क सोसायटी समोरील सर्वजनिक रोडवर घडला होता.

अटक करण्यात आलेल्या अजय साळुंके याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. नितीन उर्फ नट्टा मोहन म्हस्के याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे तीन गुन्हे दाखल आहेत. ऋषिकेश निगडे याच्याविरुद्ध दरोडा व गर्दी मारारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांनी विनापरवाना पिस्टल बाळगून गुन्हे करणे सुरु ठेवले होते.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ
(Senior Police Inspector Vinayak Vetal) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील
(DCP Smartana Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale) यांना सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करुन टोळीविरुद्ध मोक्का कारवाई
करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे
(ACP R.N. Raje) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर.एन.राजे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक संभाजी नाईक
(PSI Sambhaji Naik), पोलीस अंमलदार संदीप दळवी, संजय दगडे, अमर क्षिरसागर व बालाजी घोडके
यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्तांची तिसरी कारवाई

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर लक्ष देऊन गन्हे करणारे
आणि दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून तीन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

Web Title :- Pune Crime News | MCOCA on 5 people including Ajay Salunke who created terror by firing at Koregaon Park

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rapido Bike Taxi | ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश; रिक्षाचालकांना मोठा दिलासा

Maharashtra Government | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय