Pune Crime News | मेट्रो कामगारांचे अपहरण करुन रोकड लुटली, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कसबा पेठेतील साततोटी चौकात भुयारी मेट्रो स्थानकाचे (Metro Station) काम करणाऱ्या कामगारांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने रिक्षात बसवून अपहरण (Kidnapping Case) केले. त्यानंतर त्यांचा फोन पेचा (PhonePe) पासवर्ड घेऊन 20 हजार रुपयांची रक्कम ट्रान्सफर करुन लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत वाजिद वाहिद खान (वय-27 रा. मुंढवा लेबर कॅम्प) याने फरासखाना पोलीस ठाण्यात
(Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी 392, 364अ, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी वाजिद खान, त्याचे सहकारी मित्र अमोल गुजर, जनार्दन यादव हे पवळे चौकातील उपहारगृहात चहा पिण्यासाठी
गेले होते. तेथून ते मेट्रो साईटवर पायी चालत जात होते. त्यावेळी रस्त्यात एकाने वाजिदला धक्का दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. (Pune Crime News)

आरोपींनी तेथून जाणारी रिक्षा थांबवून तिघांना पवळे चौकाकडे नेले. चोरटा आणि साथीदाराने त्यांना चाकूचा धाक दाखविला.
तेथील एका दुकानात खान, गुजर, यादव यांना नेले. धमकावून वाजिद याचा फोन घेतला.
त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या फोन पे चा पासवर्ड घेऊन दुकानदाराला पैसे ट्रान्सफर केले.
त्यानंतर दुकानदाराकडून रोख पैसे घेऊन निघून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मांजरे तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | गर्लफ्रेंडवर प्रभाव पाडण्यासाठी चोरले 15 मोबाईल, भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांना अटक

2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; एनएसएफए संघाचा विजयी चौकार; निंबाळकर स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीची विजयी कामगिरी !

“Nok-99 Cup” under 12 Cricket Tournament | ‘नॉक-९९ करंडक’ १२ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; जस क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयन्टस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा दुहेरी विजय !