
Pune Crime News | म्हाळुंगे : कंपनीचे गेट लवकर उघडले नाही म्हणून बेशुद्ध पडेपर्यंत सिक्युरिटी गार्डला मारहाण
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Crime News | जेवण करीत असल्याने बंद पडलेल्या कंपनीचे गेट उघडण्यास उशीर झाल्याने चौघांनी सिक्युरिटी गार्डला (Security Guard) बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण (Beating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
अमोल पानझाडे (वय ३५, रा. खराबवाडी, ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. हा प्रकार खराबवाडी येथील फतेजा फोर्जिंग कंपनीच्या (Fateja Forging Company) गेटवर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडला.
याप्रकरणी हनुमंत आबुजे (वय ५५, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात (Mhalunge Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८०/२३) दिली. त्यानुसार पोलिसांनी फतेजा मॅडमचा सिक्युरिटी गार्ड अंक्या व त्याच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व अमोल पानझाडे हे मातोश्री सिक्युरिटी भोसरी
(Matoshree Security Bhosari) या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.
फतेजा फोर्जिंग कंपनीत त्यांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक झाली आहे. ही कंपनी बंद पडली आहे.
कंपनीच्या पाठीमागेच फतेजा मॅडम राहतात. त्यांचा सिक्युरिटी गार्ड त्याच्या तीन साथीदारांसह कंपनीचे गेटवर रात्री
आला होता. त्याने गेट उघडण्यास सांगितले. त्यावेळी अमोल पानझाडे हा जेवण करत असल्याने त्यास गेट उघडण्यासाठी वेळ लागला. या कारणावरुन अंक्या याने तू गेट का लवकर उघडले नाही, म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा त्याने जेवण करत होतो, त्यामुळे वेळ लागला, असे सांगितले. तेव्हा चौघांनी अमोल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अंक्याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने अमोलच्या डोक्यात वार केले.
त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. फिर्यादी यांनी अंक्याला विचारल्यावर त्याने गेट लवकर उघडले नाही म्हणून मारहाण केली.
या भांडणात अमोल हा बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्समधून चाकण येथील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल
केले आहे. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव
(PSI Dattatraya Jadhav) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा