Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; पोलिसांकडून एकाला अटक

पुणे : Pune Crime News | खिडकीतून खाली पडलेली वस्तू वर नेऊन देत असताना तिला घरात ओढून घेऊन एका सहावी-सातवीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार (Pune Minor Girl Gang Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार या पिडित मुलीने शिक्षकांना सांगितल्याने उघडकीस आला आहे (Pune Crime News). दरम्यान, कोंढवा पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. ५५५/२३) दिली आहे. हा प्रकार येवलेवाडीत २०१८ ते २०१९ दरम्यान घडला होता (Pune Crime News). कोंढवा पोलिसांनी मुन्ना मेहबुब नदाफ Munna Mehbub Nadaf (26, रा. लेन क्र. 1, जामा मस्जिद शेजारी, येवलेवाडी, पुणे. मुळ रा. नवी जिददगी, अमन चौक, सोलापूर – Solapur) याला अटक केली आहे.

फिर्यादी या ६ वी किंवा ७ वीमध्ये असताना घराशेजारील गल्लीत खेळत होत्या.
त्यावेळी एका घराच्या खिडकीतून काही तरी वस्तू खाली पडली. फिर्यादी या ती वस्तू देण्यासाठी त्या घरात गेल्या.
तेव्हा घरात असणार्‍या आरोपींनी तिला घरात ओढून घेतले. आतून कडी लावली.
तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून मोठ्या आवाजात म्युझिक लावले (Crime Against Woman).
तिचे कपडे काढून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार (Pune Gang Rape) केला.
त्यानंतर कोणाला काही सांगितले तर तुझे व तुझ्या घरच्यांचे खूप हाल करेल, अशी धमकी दिली.
त्यामुळे आजवर तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. फिर्यादी यांनी त्यांचे स्कुल शिक्षकास हा प्रकार सांगितला.
त्यानंतर हा प्रकार समोर आला असून पोलीस उपनिरीक्षक शेख (PSI Shaikh) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Minor girl gang-raped in Kondhwa in Pune; One arrested by the police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवप्रेमींना मोठी भेट, किल्ले रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘शिवराज्याभिषेक’ दिनाचे औचित्य साधून देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी, म्हणाले… (व्हिडिओ)

ACB Trap News | Anti Corruption Bureau : 10 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात