Pune Crime News | घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन, कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जबरदस्तीने घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला आहे. याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.4) सायंकाळी साडेसहा च्या सुमारास कात्रज (Katraj) येथील सच्चाईमाता मंदिर परिसरातील एका कॉलनीत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत 29 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) बुधवारी (दि.6) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नेताजी भारत माहोर Netaji Bharat Mahor (वय-37 रा. संतोष नगर, कात्रज) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 354ब, 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सोमवारी सायंकाळी फिर्यादी महिला घरामध्ये काम करत असताना आरोपी अचानक त्यांच्या घरी आला. त्याने पाठीमागून पकडून महिलेसोबत गैरवर्तन केले. त्याला विरोध केला असता आरोपीने जबरदस्तीने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भाबड (API Bhabad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

कामगारांचा पीएफ न जमा केल्याप्रकरणी हॉटेलच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल; बालेवाडीतील प्रकार

‘तू म्हाताऱ्या माणसावर दादागिरी का करतो’, तरुणावर कोयत्याने वार; पिंपरीतील घटना

बीआरटी मार्गातून जाताना पीएमटीला धडकून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी

PSI- Cop Dismissed In Pune | पुण्यात महिला पोलिस अधिकार्‍यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक