Pune Crime News | इमारतीच्या जिन्यात तरुणीसोबत गैरवर्तन; हडपसर परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | इमारतीच्या जिन्यातून जात असताना घरमालकाने व त्याच्या मित्राने तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी घरमालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. तर त्याच्या मित्राचा पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार वारंवार घडला आहे. घरमालकाच्या त्रासाला वैतागून तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुरुवारी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत 30 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर सुरेश साळवे (वय-33 रा. शेवाळवाडी) याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र नवनाथ महादेव कादबाने उर्फ कुदळे याच्यावर आयपीसी 354, 354 ड, 509, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सागर साळवे याच्या इमारतीत भाड्याने राहतात. सागर आणि त्याचा मित्र नवनाथ यांनी तरुणीला येता जाता त्रास दिला. हा प्रकार ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होता. मात्र, तरुणीने याबाबत वाच्यता केली नाही. फिर्यादी या जिन्यातून वर जात असताना आरोपींनी अचानक येऊन तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यावेळी फिर्यादी आरोपींच्या तावडीतून पळून गेल्या. यानंतर आरोपींनी अश्लिल कमेंट्स करुन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

विक्रीसाठी गांजा बाळगला, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; साडे सात लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा दहशतवाद विरोधी पथकाकडून पर्दाफाश

नवाब मलिक महायुतीत नको, आमचा तीव्र विरोध, देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

हातात स्टेथोस्कोप, अंगावर ॲप्रॉन, आमदार धंगेकर डॉक्टरांच्या वेशभूषेत पोहचले विधानभवनात

इझी पे कंपनीची साडे तीन कोटींची फसवणूक, एजंटच्या साथीदारंना परराज्यातून अटक; पुणे सायबर पोलिसांची कारवाई