Pune Crime News | पुण्यात मोबाईल मार्केटमध्ये टोळक्याचा राडा, व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण; घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये दिवसेदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील मोबाईल मार्केटमध्ये (Mobile Market in Pune) चार जणांच्या टोळक्याने दुकानांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली. तापकीर नगर येथून आलेल्या टोळक्याने दुकानांची तोडफोड केल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. हा प्रकार (Pune Crime News) सोमवारी (दि.9) सायंकाळच्या सुमारास घडला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान टोळक्याकडून दुकानांची तोडफोड होत असल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Pune Crime News)

 

गोखले नगर भागात वाहनांची तोडफोड
गोखले नगर (Gokhale Nagar) येथील विनय वसंत सोसायटी समोर मंजू मित्र मंडळ जवळ
रात्री साधारण तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाच सहा जणांच्या टोळक्याने टू व्हीलर,
रिक्षा आणि फोर व्हीलर च्या काचा फोडून नुकसान केले.
त्या प्रत्येकाच्या हातात धारदार हत्यार कोयते होते.
अनेक नागरिकांनी रात्री हे आवाज ऐकले पण जीवाच्या भीतीने कोणीही बाहेर येण्याचा प्रयत्न केला नाही.
या तोडफोडीत (Vehicle Vandalism) दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Mob rampage in mobile market in Pune, atmosphere of panic among traders; The incident was caught on CCTV

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…

MP Arvind Sawant | ‘राज्यातील सरकार घटनाबाह्य’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर घणाघात