Pune Crime News | हडपसरमधील कोयता गँगवर ‘मोक्का’, हवेत कोयते फिरवून दहशत माजवणाऱ्या समीर पठाण याच्यासह 13 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हडपसर परिसरातील सार्वजनिक रोडवर समिर लियाकत पठाण (Sameer Liaquat Pathan) आणि त्याच्या साथीदारांनी नागरीकांना शिवीगाळ करुन दगड, बेल्टने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. ही घटना मांजरी बुद्रुक येथील गोपाळपट्टी चौकात 9 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. त्यावेळी आरोपींनी गाडीवरुन जाताना कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण (Pune Crime News) केली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) 13 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 10 जणांना अटक केली आहे. समिर पठाण आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कायद्यांतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई केली आहे.

 

टोळी प्रमुख समिर लियाकत पठाण (वय-26 रा. विशाल कॉलनी, मांजरी), शोएब लियाकत पठाण (वय-20 रा. वैशाली हाईट्स, मांजरी), गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार (वय-22 महादेवनगर, मांजरी), प्रतिक उर्फ एस.के. हनुमंत कांबळे (वय-20 रा. गोपाळपट्टी, मांजरी), गितेश दशरथ सोलनकर (वय-21 रा. मांजरी रोड, हडपसर), ऋतिक संतोष जाधव (वय-19 रा. महादेव नगर, मांजरी), साई राजेंद्र कांबळे (वय-20 गोपाळपट्टी, मांजरी), ऋषिकेश उर्फ सोन्या संजय पखाले (वय-24 रा. साडे सतरानळी, मांजरी), ऋतिक सुनील मांढरे (वय-22 रा. मांजरी रोड, हडपसर), प्रतिक शिवकुमार सलगर (वय-19 रा. मांजरी) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर तीन साथीदार फरार आहेत. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात आयपीसी 307,324,504,506,143,145,147,149, महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

टोळी प्रमुख समिर पठाण आणि त्याचा साथीदार शोएब पठाण, गणेश उर्फ दादा हवालदार यांच्यावर पुणे शहरात वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यात दरोडा, मारामारी, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा (Addl CP Ranjan Sharma) यांना सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करुन आरोपींविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde) , विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle), तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijayakumar Shinde), पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde), पोलीस अंमलदार पांडुळे, शाहीद शेख, हंबर्डे, दुधाळ, सोनवणे सर्व्हिलन्स विभागाचे पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीष एर्कोगे यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्तांची दुसरी कारवाई
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर लक्ष देऊन गन्हे करणारे आणि
दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून दोन टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News ‘Mokka’ on Koyta Gang in Hadapsar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं कारण

Usman Khawaja | ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाच्या शॉटचा Video व्हायरल; “सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला आणि…!”

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर