
Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक; लोहगावमधील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत गैरवर्तन करुन एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार आरोपीच्या लोहगाव येथील मित्राच्या घरी 5 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे.
याबाबत वाघोली येथील 16 वर्षाच्या मुलीने विमातळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोहित युवराज साळवे Mohit Yuvraj Salve (वय-19 रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 354 (अ), पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी यांच्यामध्ये प्रेम संबंध (Love Affair) होते.
आरोपीने मुलीला मित्राच्या घरी नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याबाबत मुलीच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने मुलीकडे विचारणा केली.
आरोपी आणि मुलीमध्ये प्रमेसंबंध असल्याचे समजताच सोमवारी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Edible Oil Prices | सणासुदीच्या आधी गृहिणींसाठी आनंदाची बातमी: तेलाच्या किमतीबाबत आली अपडेट