Pune Crime News | पोस्ट ऑफिसात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आधार कार्ड अपडेट करणार्‍यास अटक

पुणे : Pune Crime News | आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे फिंगर प्रिंट घेण्याच्या नावाखाली तिच्याशी लगट करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Pune Police) प्रणव कुमार चक्रवर्ती Pranav Kumar Chakraborty (वय ५५, रा. एकता नगर, लोहगाव) याला अटक केली आहे.

याबाबत लोहगावमधील एका १७ वर्षाच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८३/२३) दिली आहे. हा प्रकार लोहगावातील एअरपोर्ट पोस्ट ऑफिसमध्ये (Airport Post Office Lohgaon) शनिवारी सकाळी ११ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसात गेली होती.
त्यावेळी आरोपी चक्रवर्ती याने फिर्यादी यांची फिंगर प्रिंट (Finger Print) घेतले वेळी त्यांच्या हातावर त्याचा हात ठेवला.
फिर्यादी यांच्या ओटी पोटावर ७ ते ८ वेळा स्पर्श करुन कमरेला धरुन स्वत:जवळ ओढून शारीरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी चक्रवर्ती याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक चौधरी (PSI Chaudhary) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बँकेची बनावट रिसिट पाठवून कॅनडातील नातेवाईकाच्या नावाने घातला गंडा; मनी ट्रान्सफरमधील कालावधीचा घेतला फायदा

Pune Accident News | दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी

पुणे: पहाटेच्या वेळी शंकरशेठ रोडवर कारचालकाला जबरदस्तीने लुटणार्‍या टोळीला खडक पोलिसांकडून 24 तासात अटक