Pune Crime News | दरमहा 15 टक्क्याने व्याज घेणारा सावकार खंडणी विरोधी पथक-1 कडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दरमहा 15 टक्के व्याजाने घेतलेले 30 हजार रुपये व्याजासह परत केल्यानंतर देखील जास्तीचे पैसे मागणाऱ्या खासगी सावकाराला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell Pune) अटक (Arrest) केली आहे. आरोपीने तक्रारदार यांच्याकडून 30 हजारांच्या मोबदल्यात 40 हजार रुपये घेऊन आणखी पैशांची मागणी केली आहे.

अक्षय विजय आल्हाट Akshay Vijay Alhat (वय-25 रा. सिद्धर्थनगर, धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) आयपीसी 387, 504, 506, महाराष्ट्र सावकारी कायदा अंतर्गत (Maharashtra Moneylending Act) गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी अक्षय आल्हाट याच्याकडून 30 हजार रुपये दरमहा 15 टक्के व्याजाने घेतले होते. सिक्यूरीटी म्हणून आल्हाट याने मोटार सायकल व गाडीचे पेपर स्वत:कडे ठेवून घेतले होते. फिर्य़ादी यांनी आल्हाट याला 40 हजार रुपये रोख दिले असताना आरोपीने फिर्यादी यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. तसेच रात्रीच्या वेळी घरी येऊन आई-वडिलांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनिल पवार
(ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (PI Ajay Waghmare),
पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), पोलीस अंमलदार अमोल आवाड, अमर पवार,
प्रमोद सोनावणे, मधुकर तुपसौंदर, रविंद्र फुलपगारे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, संभाजी गंगावणे यांच्या
पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | moneylender who charging interest at 15 per cent per month arrested by pune police crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे