Pune Crime News | राईस पुलरच्या नावाने १०० हून अधिक जणांना घातला ६ कोटींना गंडा; नासाच्या नावाने पुण्यातही फसवणुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राईस पुलर भान्डे विकणे आणि त्याचे परिक्षण करण्यामध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यात कोट्यावधींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

तांदुळ स्वत:कडे खेचून घेणारे धातूचे भांडे असून त्याचे परिक्षण नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था करणार आहे. त्यांच्या प्रतिनिधींना भारतात आणून त्यांचे संशोधनाच्या अहवालासाठी मोठा खर्च येतो, या धातूच्या भांड्याच्या उत्पादनामध्ये गुंतवणूक करा, या भांड्याच्या विक्रीतून मोठा फायदा मिळू शकतो,असे सांगून सर्वसामान्यांना गंडविण्यात आले आहे़ जवळपास शंभरहून अधिक जणांची ६ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) राम गायकवाड (रा. माळवाड, अकलुज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय ५०, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. राईस पुलर या नावाने देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फसवणूकीचे प्रकार आजवर उघडकीस आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी संगनमत करुन राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले.
त्यासाठी त्यांनी साधु वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता.
यामध्ये तुम्ही गुंतवणुक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल,
असे सांगितले़ त्यांना बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केला.
त्यानंतर या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतले.
गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे.
यात आतापर्यंत १००हून अधिक लोकांचे तक्रार अर्ज आले आहेत.
ही रक्कम ५ ते ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

 

Web Title :- Pune Crime News | More than 100 people were cheated of 6 crores in the name of Rice Puller; Fraud in the name of NASA also in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण