Pune Crime News | पुणे हादरलं ! पतीच्या मृत्यूनंतर मुलासह पत्नीची विष पिऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्याला हादरून सोडणारी एक घटना (Pune Crime News) घडली आहे. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना फुरसुंगी (Phursungi) भागातील भोसले व्हिलेज सोसायटीत घडली, या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे महिन्याभरापूर्वी तिघांनीही आत्महत्येचा (Pune Crime News) प्रयत्न केला होता. त्यातून आई आणि मुलगा बचावले होते. तर वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, सोमवारी दुपारी आई आणि मुलाचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली. आई आणि मुलाने पुन्हा काही विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केला. जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (Janabai Suryaprakash Abnave) (वय 60) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (Chetan Suryaprakash Abnave) (वय 41) अशी आत्महत्या केलेल्या महिला आणि मुलाची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, दि. 22 मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (Suryaprakash Harishchandra Abnave) (वय 70, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी), त्यांची पत्नी जनाबाई, मुलगा चेतन यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान सूर्यप्रकाश यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी आणि मुलाला वाचवण्यात यश आले होते. उपचारानंतर जनाबाई आणि त्यांचा मुलगा चेतन यांना रुग्णालातून घरी सोडण्यात आले होते. पण, घरी येताच या दोघांनी सोमवारी विषारी औषध पिऊन पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आर्थिक, वैयक्‍तिक व आरोग्याच्या त्रासाला कंटाळून या कुटुंबाने विषारी द्रव्य प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यावेळी तपासात निष्पन्न झाले होते. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास आई आणि मुलगा त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले होते. प्राथमिक तपासणीत त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही घटनांच्या क्रमाची चौकशी सुरू केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हडपसर पोलिस ठाण्याचे (Hadapsar Police Station) वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे (Sr PI Arvind Gokule)
यांच्या माहितीनुसार, मे महिन्यातील प्राथमिक तपासात जनाबाई कॅन्सरशी झुंज देत होत्या आणि घटस्फोट
आणि नोकरी गेल्याने चेतन तणावाखाली असल्याचे दिसून आले होते. “मे महिन्यात त्यांच्या आत्महत्येच्या
प्रयत्नानंतर, आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना सोडण्यात आले.
सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू उघडकीस येण्यापूर्वीच दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसते.

Web Title :  Pune Crime News | mother and son finish life after father death by drinking poison in phursungi hadapsar area of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा