Pune Crime News | सराईत चोरट्याकडून मोटारसायकल हस्तगत; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

Pune Crime News | Motorcycle seized from inn thief; Performance of Bharati Vidyapeeth Police

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | कात्रज चौकातील रसवंतीगृहाच्या समोरील बाजूला पार्क केलेली गाडी चोरुन नेणाऱ्या सराईत चोरट्याला पकडून त्यांच्याकडून ही मोटारसायकल जप्त केली आहे. (Vehicle Theft Detection)

मिथुन सुगंध लोखंडे Mithun Sugandha Lokhande (वय २२, रा. महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे.

कात्रज येथील रसवंतीगृहासमोर रोडवर यामाहा मोटारसायकल १६ एप्रिल रोजी पार्क केली होती़. ही मोटारसायकल चोरीला गेल्याची फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाली. या वाहन चोराचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजवरुन ही चोरी मिथुन लोखंडे यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरलेली यामाहा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांनी केली आहे.

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Attempt to kill security guard by hitting him in the head with an iron rod; Housekeeping contractor arrested, security guard in coma after fatal beating

Pune Crime News | सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हाऊस किपिंगच्या कंत्राटदाराला केली अटक, जीवघेण्या मारहाणीत सुरक्षा रक्षक कोमात