Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात; तरुणासह तिघांवर अ‍ॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीबरोबर शारीरीक संबंध (Physical Relations) ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडले. लग्नाचा विषय काढल्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत मुंढवा येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Mundhwa Police Station) फिर्याद
(गु. रजि. नं. १५४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन सतीश काकडे Sachin Satish Kakade
(वय २५, रा. मंठा, जि. जालना), सतीश काकडे, लक्ष्मी काकडे यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार (Atrocities Act)
गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२१ ते डिसेबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सचिन काकडे याने लग्नाचे आमिष दाखवून
त्यांच्याबरोबर वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. फिर्यादी या गर्भवती राहिल्यानंतर त्यांना लासलगाव
येथे घेऊन जाऊन त्यांचा जबरदस्तीने गर्भपात केला. त्यानंतर त्यांनी लग्नाविषयी विचारल्यावर त्यांना
जातीवाचक बोलून शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Mundhwa Police Station – Forced abortion after intercourse; A case under Atrocity has been registered against three people including the youth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police – SP PR Patil | पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार पोलिसांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात तब्बल 116 तक्रारींचे निवारण

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र’; आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश