पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंढवा पोलिस स्टेशनच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील एबीसी रोडवरील (ABC Road Mundhwa) ताडीगुत्ता चौकाजवळील हॉटेल (पब – Pub) ओरीला (Orilla Mundhwa) मध्ये एन्ट्री न दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळुन वेटरला पकडून ठेवुन त्याच्या पाठीवर, हातावर व डोक्यात सपासप वार करून खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. ही घटना शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime News)
धिरेंद्र अवदेश चौहान (27, रा. धायरकर कॉलनी, ब्लु शेक हॉटेल जवळ, मुंढवा) याने यासंदर्भात पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अबीद युसुफ खान Abid Yusuf Khan (20, रा. लोहियानगर, फायरब्रिगेट विभागाजवळ, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी धिरेंद्र हा हॉटेल ओरीला (पब) मध्ये वेटरचे काम करतो. शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास धिरेंद्र काम संपवुन त्याचा सहकारी विक्रम उदाइन याच्यासह पायी निघाला होता. (Pune Crime News)
अटक आरोपी अबीद युसुफ खान आणि त्याच्या दोन साथीदार तेथे आले. त्यापैकी दोघांनी विक्रम उदाईन यास पकडुन ठेवले तर एकाने धिरेंद्रला ‘क्यु रे हमे एन्ट्री नही दे रहे थे, तब क्यु हस रहा था’ असे म्हणून त्याच्याकडील धारदार हत्याराने त्याच्या पाठीवार, हातावर आणि डोक्यात सपासप वार केले. काही क्षणात हल्लेखोर तेथून निघून गेले. धिरेंद्र गंभीर जखमी झाल्याने परिसरात काही प्रमाणात घबराहट निर्माण झाली.
घटना घडल्यानंतर त्याबाबतची माहिती मुंढवा पोलिसांना देण्यात आली. मुंढवा पोलिस स्टेशनमधील काही अधिकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उपचारासाठी धिरेंद्रला रूग्णालयात पाठविण्यात आले. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे (Sr. PI Ajit Lakade) आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटना शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर शनिवारी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी अबीद युसुफ खान याला अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप जोरे (API Sandeep Jore) यांनी दिली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.बी. जोरे (API S.B. Jore) करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Mundhwa Police Station: One was stabbed with a sharp weapon for
not giving entry to Orila Pub in Mundhwa ABC Road
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Politics News | गरज पडल्यास 48 जागा स्वबळावर लढणार, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने आघाडीत खळबळ
- General Transfers Of Maharashtra Police Inspectors (PI) | राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या आणखी काही दिवस रखडणार?
- New Parliament Building Inauguration | ‘…तर बरं झालं असतं’, नव्या संसद भवनाच्या लोकार्पणानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया