Pune Crime News | मुंढवा: लग्न जमले असताना शारीरीक संबंध ठेवून नंतर दिला लग्नास नकार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | परस्पर संमतीने त्यांचे लग्न जमले. त्यानंतर घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर आता लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत केशवनगरमधील एका २८ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१५/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन राजेंद्र तळवार Sachin Rajendra Talwar (रा. आशा एम्पायर, गोकुळ कॉलनी, दिघी) याच्यावर बलात्काराचा (Rape Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ मे २०२३ पासून घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह आरोपीबरोबर ठरविण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यात फोनवर बोलणे होत असे. ३ मे रोजी आरोपी सचिन याने फिर्यादी यांच्याशी फोनवर बोलून घरी कोण आहे का असे विचारले. त्यांनी घरी कोणी नसल्याचे सांगितले. तेव्हा तो फिर्यादीच्या घरी आला. त्याने आता आपले लग्न ठरले आहेच, असे म्हणून त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. त्याबाबत त्यांनी विचारणा केल्यावर आरोपीने फिर्यादी यांना हाताने मारहाण (Beating) केल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक गाडे (PSI Gade) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Advt.

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना, तीन अल्पवयीनांसह सहा जण ताब्यात

Heavy Vehicles Prohibited on Pune Roads for Ganeshotsava | गणेशोत्सव काळात पुण्यातील ‘या’ 10 रस्त्यांवर जड वाहतूकीला बंदी

Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत

Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024 | अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीची तयारी करण्याची सूचना

Sharad Pawar-Ajit Pawar | पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार

Chhagan Bhujbal On Telgi Scam | तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य, शरद पवारांच्या ‘त्या’ कृतीवर व्यक्त केली नाराजी