Pune Crime news : अनैतिक संबंधातून तो खून झाल्याचं उघड, सिंहगड रोड परिसरातील पाण्याच्या टाकीत आढळला होता मृतदेह

पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड परिसरात गळादाबत डोक्यात वारकरून झालेल्या त्या murder खूनाचा murder छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी महिलेला अटक केली आहे. तर दोन मुलांचा शोध सुरु आहे. खून murder केल्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला होता.

ग्यानवंती यादव/प्रसाद (वय 34) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. यात कृष्णकुमार प्रसाद (वय 24) याचा खून झाला आहे. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोघेही नऱ्हे परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. मूळचे बिहारचे आहेत. महिलेचा पहिला विवाह झालेला आहे.

मात्र बिहारमध्ये असतानाच कृष्णकुमार व तिचे सूत जुळले होते. गेल्या 6 वर्षांपासून त्यांचे अनैतिक संबंध होते.

अडीच वर्षांपूर्वी महिलेने कृष्णकुमार याला अडीच लाख रुपये दिले होते. हा प्रकार तिच्या पतीला समजल्यानंतर त्याच्यांत वाद झाले होते.

यानंतर दोघे दोन वर्षांपासून पुण्यात येऊन राहत होते. मात्र पुण्यात आल्यानंतर आणि दोघे एकत्र राहत असताना कृष्णकुमार याचे दुसऱ्याच एका तरुणीशी प्रेम प्रकरण सुरु झाले.

हि बाब महिलेला समजली. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले.

यातून हा खून झाला असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.

महिलेने खुनाचे प्लॅनिंग केले. बिहारवरून दोन मुलांना बोलवून घेतले. ते आले. पण त्याची माहिती कृष्णकुमार याला होऊ दिली नाही.

तो घरी येण्याच्या वेळी या मुलांना बाहेर पाठवले. तो रात्री घरी आल्यानंतर दारू प्यायला.

यानंतर या मुलांच्या मदतीने तिने कृष्णकुमार याच्या डोक्यात रॉड घातला.

त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला. खुनानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून दिला आणि पती बहार गया था, उसको किसने मारा ये मालूम नही असा म्हणत बनाव केला.

पोलिसांना मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली होती. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता.

पहिल्यापासूनच पोलिसांना या महिलेवर संशय होता. पण ती काहीच सांगत नव्हती.

तर इतर माहिती नव्हती. मात्र या महिलेला पोलीस खाक्या आणि त्या दोन मुलांबाबत सांगताच तिने खुनाची कबुली दिली.

तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या दोन पथकांनी चार दिवसापासून केलेल्या तपासानंतर हा खून उघडकीस आला आहे.

महिलेला अटककरून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने केली आहे.

कृष्णकुमार गुरुचरन प्रसाद (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार हा सेन्ट्रीगचे कामे करत होता.

तो राहण्यास सिंहगड परिसरात होता. त्याचा विवाह झालेला नाही.

पण, तो लिव्हइनमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी (31 मे) नऱ्हे येथील अभिनव कॉलेजजवळ शिवनेरी बी. नवीन बांधकाम साईड सुरू आहे.

येथील पाण्याच्या टाकीत मृतदेह असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस यांना कॉलकरून माहिती दिली.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.

त्यात डॉक्टरांनी डोक्याला मार आणि गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पस्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खुनाचे कारण आणि हल्लेखोर याबाबत माहिती घेतली जात असून, लवकरच गुन्हा उघड होईल, असे पोलीस निरीक्षक घेवारे यांनी सांगितले.

Also Read This : 

 

जाणून घ्या अँड्रॉयड युजर्संसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे ‘फ्लॅश कॉल्स’ फीचर

 

कोरोनातून बरे झाल्यावर ‘या’ गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन, अन्यथा…