Pune Crime News | डोके जमिनीवर आपटून सुनेचा केला खून, दिवसभराच्या चौकशीनंतर सासुची कबुली; लोहगावमधील घटना

पुणे : Pune Crime News | पाय लागल्याने सूनेने सासूला शिवीगाळ केली. त्या रागातून तिला मारहाण करुन फरशीवर पडलेल्या सूनेचे सासूने केस धरुन डोके जमिनीवर आपटून तिचा खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी (Pune Police) सासूला अटक केली आहे. (Pune Crime News)

कमला प्रभुलाल माळवी (वय ४९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे सासूचे नाव आहे. रितु रवींद्र माळवी (वय २८) असे मृत्यु पावलेल्या सुनेचे नाव आहे (Police Arrest Mother In Law). याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समु रामकिशोर चौधरी (PSI Samu Ramkishor Chowdhary) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२७/२३) दिली आहे. ही घटना लोहगावमधील कलवड वस्तीत (Kalwad Wasti Lohegaon Pune) ६ मार्च रोजी पहाटे ३ वाजता घडली. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र आणि रितु यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
या लग्नाला सासू कमला माळवी हिचा विरोध होता. रितू, रवींद्र यांना एक मुलगाही आहे.
लग्नाला १० वर्ष झाल्यानंतरही कमला यांचा विरोध कमी झाला नाही.
त्यावरुन त्या नेहमी सुनेशी भांडणे करीत असत. घरकाम, स्वयंपाक व नातवाला व्यवस्थित सांभाळत नाही,
म्हणून त्या कायम सुनेला बोलत असत. ६ मार्च रोजी पहाटे चहा करण्यासाठी सासू बेडरुममध्ये ठेवलेल्या
फ्रिज उघडत असताना त्यांचा पाय सुनेला लागला. त्यावरुन सुनेने त्यांना शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने सासुनेही तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यात रितु खाली फरशीवर पडल्या. तेव्हा सासुने तिचे केस धरुन डोके जमिनीवर आपटले. त्यात रितु हिचा मृत्यु झाला. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनात डॉक्टरांनी डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यु झाल्याचा अहवाल दिला.

झोपेत असताना सुन कॉटवरुन पडल्याने तिच्या डोक्याला लागून तिचा मृत्यु झाल्याचे सासु सांगत होती.
मात्र, ते सांगताना ती गडबडल्याने पोलिसांना संशय आला. तिच्याविषयी माहिती घेतल्यावर दोघींची नेहमी भांडणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सासुकडे वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली. त्यानंतर तिने आपणच फरशीवर तिचे डोके आपटल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने (API Lahane) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Murder In Kalwad Wasti Lohegaon Pune Viman Nagar Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | उद्धव ठाकरेंच्या सभेला तुम्ही गर्दी जमवली का? अजित पवारांचं मिश्किल उत्तर म्हणाले-‘आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला…’

Pune News | मित्रांसोबत धुलिवंदन खेळून रंग धुण्यासाठी नदीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, मावळातील घटना

Gadchiroli Crime News | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भावावर FIR, जाणून घ्या प्रकरण