Pune Crime News | दांडेकर पूल परिसरात एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील दांडेकर पूल (Dandekar Bridge) भागात एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना (Pune Crime News) दांडेकर पूल परिसरातून जनता वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (दि.25) उघडकीस आली आहे.

 

अनिल शिवाजी मोरे (वय-51) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खूनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Senior PI Jairam Paigude) यांनी दिली.

बुधवारी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवली असून खूनाचे कारण समजू शकले नाही. दत्तवाडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :  Pune Crime News | murder of a person in dandekar bridge area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा